आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाखत:माजी पंतप्रधानांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं, आज देशाला एका मनमोहन सिंगांची गरज आहे - शरद पवार 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज सामनाच्या डिजिटल प्लॉटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्येही त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणकारांसोबत बोलण्याची नितांत गरज आहे. देशाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या व्यक्तीची 100% गरज आहे' असे मत पवारांनी व्यक्त केले.  

आजच्या काळात देशाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांची गरज आहे का असा प्रश्न राऊतांनी त्यांना विचारला. याचे उत्तर देताना ते म्हणाले की, '100% पर्सेंट गरज आहे. कारण मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर झाले तेव्हा त्या मंत्रिमंडळात मी होतो. मला माहितीय की, त्या वेळेला फायनान्शियल क्रायसेसमधून कसे आम्ही जात होतो, पण मनमोहन सिंगांनी एक नवीन दिशा दिली. या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं त्या मनमोहन सिंगांना मी श्रेय देतो तसं नरसिंह रावांनाही श्रेय देतो. या दोघांनी नेहमीच्या चौकटीचा रस्ता बदलून वेगळय़ा वळणावर गाडी नेली आणि सबंध अर्थव्यवस्था सावरली. आज त्याची आवश्यकता होती. तशा प्रकारच्या तज्ञ लोकांची मदत घेऊन मोदी साहेबांनी पावलं टाकायला हवीत. माझी खात्री आहे, अशा कोणत्याही प्रयत्नांना देश सहकार्य करेल.'

बातम्या आणखी आहेत...