आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा राज्यात पुनरागमन केले आहे. मुंबई, मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्याभरापासून पावसाने राज्यात दडी मारली होती. मात्र, आता पावसाचे वातावरण तयार झाले असून, हवामान विभागाने राज्यातील अनेक मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, मुंबई, पुण्यातील काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पण बुधवारी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील चार दिवस अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला असून काही भागात येलो आणि ऑरेंट अलर्ट देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाची हजेरी
मराठवाड्याच्या अनेक भागात काल पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील अनेक भागात रात्री पाऊस झाला. मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकरी आपले शेतीची कामे उरकवण्यासाठी प्रयत्न करत पाहायला मिळत आहे. पिकांची खुरपणी, वखरणी, खते टाकणे असे कामे सध्या शेतकरी करताना पाहायला मिळत आहे.
मुंबई पावसाची हजेरी
गेल्या आठड्याभरापासून मुंबईत पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती. मात्र, रात्री मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासूनच राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणात पाहायला मिळत आहे. नवी मुंबईत येत्या 24 तासांत तीव्र सरींसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.