आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात एकीकडे उन्हाचा पारा वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, यावर्षी राज्यात यावर्षी चांगला पाऊस राहण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात 880 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे याही वर्षी बळीराजा सुखावणार आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये स्कायमेटने सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. तो कायम ठेवला आहे. ला निना आणि एल निनोचा प्रभाव मान्सूनवर पडणार नाही, असे देखील स्कायमेटने म्हटले आहे.
'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता कमी
स्कायमेटने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, मध्यप्रदेश-उत्तरप्रदेश आणि पंजाब, हरियाणामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. तर गुजरातमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल. राजस्थान आणि गुजरातसह, ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये संपूर्ण हंगामात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे केरळ आणि कर्नाटकातही जुलै-ऑगस्टमध्ये कमी पाऊस पाडण्याचा अंदाज आहे. अंदाजानुसार, देशभरातील पावसाळ्याचा पहिला भाग उत्तरार्धापेक्षा चांगला राहील. जूनमध्ये मान्सूनची चांगली सुरुवात अपेक्षित आहे.
जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज
गेल्या वर्षी मान्सूनची ही होती स्थिती
संपूर्ण भारतात मान्सूनच्या 4 महिन्यांत सरासरी 880.6 मिमी पाऊस पडतो, याला दीर्घ कालावधी सरासरी (LPA) म्हणतात. म्हणजेच, 880.6 मिमी पाऊस 100% मानला जातो. स्कायमेटने गेल्या वर्षी 907 मिमी पावसाचा अंदाज वर्तवला होता. यावेळी 862.9 मिमी इतका आकडा देण्यात आला आहे. एजन्सीचा अंदाज खरा ठरला, तर सलग चौथ्या वर्षी भारतात चांगला मान्सून राहील.
पाऊस कसे मोजतात?
1662 मध्ये, क्रिस्टोफर रेन यांनी ब्रिटनमध्ये पहिले पर्जन्यमापक तयार केले. त्याचा आकार बीकर किंवा नळीसारखा असतो ज्याला वाचन स्केल जोडलेले असते. या बीकरवर एक फनेल आहे, ज्याद्वारे पावसाचे पाणी एकत्र होते आणि बीकरमध्ये येते. बीकरमधील पाण्याचे प्रमाण मोजून पाऊस किती पडला हे तपासले जाते. बहुतेक पर्जन्यमापकांमध्ये, पाऊस मिलिमीटरमध्ये मोजला जातो.
काही भागांत अवकाळीची स्थिती
राज्यात अनेक भागात तापमानात चढउतार होत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणखी दोन ते तीन दिवस पावसाळी स्थिती राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
सोलापुरात पावसाची हजेरी
सोमवारी सोलापुरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने गारांसह हजेरी लावली. त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला द्राक्षेबागाला मोठा फटका बसला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.