आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची आनंदवार्ता:​​​​​​​तळकोकणानंतर अखेर मान्सून मुंबईत दाखल; हवामान विभागाने दिली माहिती

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सून आज मुंबई दाखल झाला आहे. शुक्रवारी तळकोकणात मान्सूनने एंट्री केली होती. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार, आज डहाणू, मुंबई, ठाणे, रायगडमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटकातील गदगपर्यंत मान्सून दाखल झाला आहे.

मुंबईच्या हवामान विभागाने देखील मान्सूनच्या आगमनाबाबत माहिती दिली आहे. आज मान्सून मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात दाखल झाला आहे. मान्सून मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढे सरकला असल्याची माहिती मुंबईच्या हवामान विभागाने दिली आहे.

राज्यात विविध भागात आज पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबई आणि उपनगरासह पुणे, नाशिक, कोल्हापूरल या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर पुण्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली असून, पुणे पोलिस आयुक्ताल्यासमोरील झाड कोसळल्याची घटना घडली.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मृगनक्षत्राचा मुहूर्त चुकवल्यानंतर मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनने सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात सर्वत्र दमदार हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणारा बळीराजा त्यामुळे सुखावणार आहे. आता खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. पुढील दोन ते तीन दिवस लखलखाट तसेच गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बातम्या आणखी आहेत...