आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अँटीलिया प्रकरणात सापडलेल्या स्पॉर्पियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास महाराष्ट्र ATS करत आहे. एटीएसने गुरुवारी रात्री ठाण्यातील खाडी परिसरात डमी बॉडीने घटना रीक्रिएट केली. एटीएसला संशय आहे की, मनसुख यांचा खून करुन मृतदेह या ठिकाणावरुन फेकून देण्यात आला आहे. सीन रीक्रिएट करतेवेळी खाडीमध्ये लो टाइड होती.
सीन रीक्रिएशननंतर ATS च्या टीमने हवामान तज्ज्ञ आणि स्थानिक मच्छीमारांची भेट घेतली. यानंतर काही मच्छीमारांचे जबाबदेखील नोंदवण्यात आले. परंतु, या कारवाईबाबत कुठलीच माहिती सार्वजनिक करण्यात आली नाही.
NIA च्या पथकाने मनसुख यांच्या नातलगांची भेट घेतली
दरम्यान, गुरुवारी NIA च्या एका पथकाने मनसुख यांच्या घरी दाखल होऊन त्यांच्या नातलगांची तीन तास बातचीत केली. यादरम्यान हिरेन यांच्या पत्नी विमला, दोन मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. सूत्रांनी सांगितल्यानुसार, या बातचीतदरम्यान पथकाने स्कॉर्पियो कारला केंद्रस्थानी ठेवले होते. या कारसंबंधी जास्तीत-जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.