आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरण:आता NIA करणार मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास, 5 मार्चला मुंब्रा येथील खाडीमध्ये सापडला होता मृतदेह, वाझेंवर संशय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ATS ला वाझे हे मनसुख यांच्या हत्येच्या कटात सामिल असल्याचा संशय

अँटिलिया बाहेरून जप्त करण्यात आलेल्या स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपासही आता राष्ट्रीय तपास एजेंसी (NIA) करणार आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक(ATS) ने सेक्शन 8 नुसार हा तपास NIA ला सोपवण्याचा निर्णय घेतला. ATS चीफ जयजीत सिंह यांनी याची पुष्टी केली आहे.

ATS ने मनसुख यांच्या मृत्यूनंतर हा तपास आपल्या हातात घेतला होता. यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान ATS ने आतापर्यंत 25 लोकांचा जबाब नोंदवला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संबंधीत एक आदेशही जारी केला आहे. ज्यानंतर मानले जात आहे की, हे प्रकरण लवकरच NIA ला हँडओव्हर करण्यात येईल. नियमानुसार एजन्सी अनुसूचित गुन्ह्याचा तपास करत असेल तर ती गुन्हेगाराने केलेल्या इतर खटल्याची चौकशी एकाच वेळी करू शकते.

खाडीत सापडला होता मृतदेह

मनसुख यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्राच्या खाडीमध्ये सापडला होता. त्यांच्या पत्नीने CIU चे माजी अधिकारी सचिन वाझे यांच्यावर खून केल्याचा आरोप केला. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण विधानसभेत उपस्थित केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याचा तपास ATS कडे सोपवला.

ATS ला वाझे हे मनसुख यांच्या हत्येच्या कटात सामिल असल्याचा संशय
अँटिलिया प्रकरणात निलंबित आणि अटक करण्यात आलेल्या सचिन वाझेंच्या अटकपूर्व जामिनासाठी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक(एटीएस) ठाणे सत्र न्यायालयात आपला जबाब दाखल केला. दरम्यान, यामध्ये त्यांनी मनसुखच्या हत्येत सचिन वाझेंचा हात असल्याचा संशय व्यक्त करत एटीएसने त्यांचा ताबा मागितला आहे. एटीएसला 4 ते 5 मार्च दरम्यान काय झाले हे जाणून घ्यायचे आहे? घटनांचा क्रम काय होता? 17 आणि 25 दरम्यान स्कॉर्पिओ कार कुठे होती? दरम्यान न्यायालयाने यावर अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही आणि पुढील सुनावणी 30 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...