आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका स्कॉर्पियो कारजवळ दिसत आहेत. ही कार हूबेहूब अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार सारखी आहे. महाराष्ट्र ATS आता या व्हायरल व्हिडिओचा तपास करत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गेल्या वर्षी 5 नोव्हेंबरचा आहे, जेव्हा वाझे हे पोलिस पथकासह पत्रकार अर्णब गोस्वामीला अटक करत होते. यावेळी, रिपब्लिक टीव्हीच्या टीमने त्यांचा पाठलाग केला, त्यानंतर त्यांनी ताफा थांबवला. त्यावेळी तीच संशयास्पद कार त्याच्या जवळ उभी असल्याचे दिसून येत आहे.
आज कोर्टात समोर हजर केले जाणार
मुंबई पोलिसचे पोलिस निरीक्षक सचिन वाझेंना NIA आज कोर्टात समोर हजर केले जाणार आहे. NIA कोर्टाकडून वाझेंच्या कस्टडीची मागणी करतील. यापूर्वी वाझे यांना शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली होती. NIA ने त्यांना अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्याची भूमिका निभावणे आणि सरभाग असल्याच्या कारणामुळे अटक केली.
पुढील सुनावणी 19 मार्च रोजी
ठाण्याच्या सत्र न्यायालयानेही शनिवारी वाझेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. सुरुवातीला त्याच्याविरोधात काही पुरावे असल्याचे कोर्टाने म्हटले होते. अटक टाळण्यासाठी वाझे यांनी शुक्रवारी अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. या खटल्याची पुढील सुनावणी 19 मार्च रोजी होणार आहे.
कार मालकाच्या मृत्यूच्या प्रकरणातही आरोप झाले
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर 'अँटिलिया'च्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन याच्या मृत्यूच्या प्रकरणातही त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणाचा तपास अँडी टेररिझम स्कॉड (ATS) करत आहे. या संपूर्ण प्रकरणात मनसुख यांच्या स्कॉर्पिओ चोरीचेही एक प्रकरण समोर आले असून महाराष्ट्र पोलिस तपास करत आहेत.
सचिन वाझेंवरील सर्व आरोपानंतर महाराष्ट्र गृहखात्याच्या आदेशानुसार त्यांना गुन्हे शाखेतून काढून टाकण्यात आले. त्यांना नागरी सुविधा केंद्रात पाठवण्यात आले आहे. शुक्रवार 12 मार्च रोजी संध्याकाळी हा आदेश देण्यात आला. 10 मार्च रोजी विरोधकांनी महाराष्ट्र विधानसभेत या प्रकरणात गोंधळ घातला होता. यावर गृहराज्यमंत्री अनिल देशमुख हे वाझेंच्या बदलीबाबत बोलले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.