आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया स्फोटके प्रकरण:औरंगाबादेतून चाेरलेल्या कारमध्ये झाली हाेती मनसुख हिरेनची हत्या, एटीएसच्या पथकातील अधिकाऱ्याचा दावा

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अँटिलिया स्फोटकेप्रकरणाशी संबंधित मनसुख हिरेन या ठाण्यातील ‌‌व्यापाऱ्याची हत्या औरंगाबादहून चाेरलेल्या गाडीमध्ये झाली होती, असा दावा दहशतवादी प्रतिबंधक प्रथकातील (एटीएस) एका अधिकाऱ्याने केला आहे.

एनआयएच्या आधी हिरेन हत्याकांडाचा तपास एटीएसकडे होता. या पथकामध्ये या अधिकाऱ्याचा समावेश होता. या गाडीसोबतच आणखी एक गाडीही दिसली होती. ४ मार्च रोजी ही गाडी निलंबित एपीआय सचिन वाझे चालवत होता असा संशय आहे. त्याच्या एक दिवस आधी हिरेनचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळला होता. विशेष म्हणजे या गाडीचा अद्यापही तपास लागलेला नसून कदाचित ती नष्ट करण्यात आली असावी, असे अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, सचिन वाझे याला पोलिस दलातून बडतर्फ करण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. अँटिलिया प्रकरणी वाझेला १३ मार्च रोजी एनआयएने अटक केली होती. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...