आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mansukh Wrote Letter To CM Three Days Before Death: Hiren Death; Mukesh Ambani Antilia House Case Update | Pune Mansukh Hiren Body Found, Maharashtra ATS Probe Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसुख मृत्यू प्रकरणी नवीन खुलासा:मृत्यूच्या अवघ्या 3 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते पत्र; म्हणाले होते- मी पिडित असतानाही मला आरोपींसारखी वागणूक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्रातून दिली स्कॉर्पिओ कशी चोरीला गेली आणि सापडली याची माहिती

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ मालकाच्या संशयास्पद मृत्यूमध्ये नव-नवीन खुलासे समोर येत आहेत. आता संबंधित कार मालक मनसुख हिरेन यांनी 2 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते असे समोर आले आहे. हेच पत्र त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनाही पाठवले होते.

या पत्रामध्ये हिरेन यांनी लिहिले होते, की पोलिस आणि मीडियाकडून मला त्रास दिला जात आहे. पुन्हा-पुन्हा तेच प्रश्न विचारले जात आहेत. या प्रकरणात मी स्वतः एक पीडित असून मला आरोपींसारखी वागणूक दिली जात आहे असा आरोप त्यांनी केला होता.

कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही
पत्राच्या सुरुवातीलाच मनसुख यांनी आपला परिचय देताना लिहिले, की मी आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहत आहे. माझे वय 46 वर्षे असून कार अॅक्सेसरीजचा व्यवसाय करतो. गेल्या 21 वर्षांपासून मी याच व्यवसायात आहे. 'स्टाइल क्लासिक कार डेकोर' असे माझ्या दुकानाचे नाव आहे. मी एक शांतीप्रिय व्यक्तू असून माझा कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारचे मालक आणि ठाणे येथे व्यापारी असलेले मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी समुद्र किनारी सापडला. संशयास्पद अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहाच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एटसीएसकडे सोपविली आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत.

अशी चोरीला गेली होती कार
'2018 मध्ये मी स्कॉर्पिओ कार खरेदी केली होती. 17 फेब्रुवारी 2021 रोजी संध्याकाळी MH-02-AY-2815 वाहन क्रमांक असलेली ही कार घेऊन मी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील एका दुकानातून आपल्या दुकानाकडे निघालो होतो. ऐरोली ब्रिज संपून विक्रोळी परिसरात सर्विस रोड लागतो. याच रोडवर स्कॉर्पिओ कारचे स्टिअरिंग लॉक झाले. त्यामुळे मला कार ईस्टर्न एक्सप्रेस वे वर सोडून मुंबईला परतावे लागले.

'दुसऱ्या दिवशी 18 फेब्रुवारी 2021 रोजी जवळपास 12:00 वाजता मी आपली कार घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलो. पण, त्या ठिकाणी माझी कार नव्हती. त्यानंतर मी विक्रोळी पोलिस स्टेशनला जाऊन कार चोरीला गेल्याचा FIR दाखल केला.

कार सापडल्याची बातमी एटीएसने दिली
'25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता दहशतवाद विरोधी पथक (ATS) मध्ये असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी माझ्या घरी येऊन कार सापडल्याची बातमी दिली. पण, ही कार मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडल्याचे सांगितले, तेव्हा मला धक्काच बसला. काही वेळ चौकशी करून ते तेथून निघून गेले.'

'दुसऱ्या दिवशी 26 फेब्रुवारीच्या संध्याकाळी 4 वाजता पोलिस माझ्या घरी आले आणि मला विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. दुसऱ्या दिवसाच्या सकाळी 6 वाजेपर्यंत मला तेथेच ठेवण्यात आले. त्यानंतर मला त्यांनी घरी सोडले.'

वारंवार होणाऱ्या चौकशीने त्रस्त
'27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता विक्रोळी पोलिस स्टेशनमधून मला फोन आला. त्याच दिवशी 3 वाजता घाटकोपर पोलिस स्टेशनमधून सुद्धा फोन आले. यानंतर 1 मार्च रोजी मला नागपाडा एटीएस टीमने बोलावले. याच दिवशी क्राइम इंटेलिजेंस यूनिटचे अधिकारी सचिन वझे यांनी मला फोन करून बोलावले. सर्वच ठिकाणी मला सारखेच प्रश्न विचारण्यात आले. एनआयए अधिकाऱ्यांनी सुद्धा माझी चौकशी केली. यानंतर सह-आयुक्त भामरे यांनी देखील तेच प्रश्न विचारले.' विविध अधिकाऱ्यांकडून माझी चौकशी करून मी पीडित असतानाही मला आरोपींची वागणूक देण्यात आली. एवढेच नव्हे, तर मला माध्यमांनी सुद्धा त्रस्त करून सोडले.'

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या एटीएस करत असून मनसुख यांचा पोस्टमॉर्टम अहवाल आजच येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...