आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Many Of The Women Taken By Sattar From Sillod To Mumbai Were Starving, Varanabhat Before Departure, Then A Little Likeness The Very Next Day.

नेत्यांचा मेळावा, कार्यकर्त्यांचे हाल:सत्तारांनी सिल्लोडहून नेलेल्या महिला उपाशीच; निघण्यापूर्वी वरणभात, नंतर दुसऱ्या दिवशीच उपमा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासाठी राज्यात सर्वाधिक ३५० एसटी बसेस बुक करण्याचा विक्रम कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. मंगळवारी (४ ऑक्टोबर) सकाळपासूनच त्यांच्या बसेसचा ताफा मुंबईकडे रवाना झाला होता. यात मोठ्या संख्येने ज्येष्ठ महिलांही होत्या. मात्र या प्रवासात त्यांची गैरसोय झाली.

बुधवारी (५ ऑक्टोबर) मुंबईत पोहोचलेल्या सिल्लोडच्या २५ हून अधिक महिलांशी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. बहुतांश महिला ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होत्या. त्या ग्रामीण भागातून आलेल्या होत्या. ‘आम्ही मंगळवारी सिल्लोडहून निघण्यापूर्वी थोडाचा वरणभात खायला दिला होता. नंतर रस्त्यात काहीच दिले नाही. दिवसभर उपाशीच राहावे लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचलो तेव्हा थोडाच उपमा मिळाला. तोही भांडून घ्यावा लागला, काही जणींना तर तेही मिळाले नाही. ज्यांनी सोबत आणले तेही आता गायब झालेत,’ अशा तक्रारी या महिलांनी केल्या.

बातम्या आणखी आहेत...