आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maratha Arakshan Updates : Decision Soon On The Application For Setting Up Of A Tribunal On The Application Of Maratha Reservation, The Chief Justice's Motto; Third Application Filed By The State Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:मराठा आरक्षणाच्या अर्जावर घटनापीठ स्थापन करण्याच्या अर्जावर लवकरच निर्णय, सरन्यायाधीशांचे सूतोवाच; राज्य शासनाचा तिसरा अर्ज दाखल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेडिकलसाठी मराठा विद्यार्थ्यांचा शुल्कभार सरकार उचलणार - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेणार असल्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. घटनापीठ स्थापन करण्यात यावे यासाठी राज्य शासनातर्फे सोमवारी तिसऱ्यांदा अर्ज करण्यात आला.

शासनाचे वकील व ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्या विनंतीनंतर सरन्यायाधीशांनी हे सूतोवाच केल्याची माहिती मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावे, अशीच राज्य सरकारची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या तीनसदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी सोमवारी सरन्यायाधीशांना केली. राज्य शासनाने यापूर्वी दोन वेळा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याचेही रोहतगी यांनी निदर्शनास आणून दिले.

मेडिकलसाठी मराठा विद्यार्थ्यांचा शुल्कभार सरकार उचलणार

मराठा आरक्षणला अंतरिम स्थगिती असल्याने वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून सुरू करणार असून प्रवेशात आरक्षणापासून वंचित राहणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या शुल्काचा भार राज्य सरकार उचलणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी दिली. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठच वैद्यकीय विभागानेही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणामुळे मराठा विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये दिलासा मिळणार होता. मात्र स्थगिती असल्याने सगळी प्रवेश प्रक्रिया थांबवता येणे शक्य नाही. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांच्या शुल्काचा भार सरकारने उचलावा असा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडणार आहे, असे ते म्हणाले.