आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maratha Community Aggressive After Supreme Court Adjournment, Agitations Started In Various Places In Mumbai, Increase In Police Security

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार:आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक, मुंबईत विविध ठिकाणी आंदोलनाला सुरुवात, आंदोलन परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत जवळपास 20 ठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलक केलं जात आहे.

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. यानंतर राज्यात मराठा समाज हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज राज्यातील वातावरण तापलेलं दिसत आहे. आज मुंबईतील विविध ठिकाणी मराठा समाज ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. मुंबईत दादर येथील प्लाझा थिएटरबाहेर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.

मुंबईत जवळपास 20 ठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलक केलं जात आहे. दरम्यान या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच आंदोलक देखील सोशल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण होऊ नये याससाठी महत्त्वाची खबरदारी घेतली जाणार आहे.

मराठा समाजातर्फे मुंबईत होत असलेल्या या आंदोलनात कोरोनासदंर्भात सर्व नियमांचे पालन केले जात आहेत. दरम्यान आंदोलक हे तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर या सर्व दक्षतेचे पालन केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मराठा आरक्षणाच्या स्थगितीविरोधात मराठा क्रांती मोर्चा निषेध नोंदवत आहेत. मुंबई लगतच्या शहरांमध्ये एकाच वेळी ठिय्या आंदोलन केलं जात आहे.

बातम्या आणखी आहेत...