आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण़:मराठा आरक्षणप्रश्नी क्रांती मोर्चाचे आंदोलन; मुंबई, औरंगाबादसह राज्यात विविध ठिकाणी ठिय्या...

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत फिजिकल डिस्टन्सिंग पाळून आंदोलकांनी अशी निदर्शने केली. महानगरात 18 ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. - Divya Marathi
मुंबईत फिजिकल डिस्टन्सिंग पाळून आंदोलकांनी अशी निदर्शने केली. महानगरात 18 ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.
  • कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त हाेता

राज्यात होणारी साडेबारा हजार पोलिस शिपाई भरती रद्द करावी या व इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबईत विविध १८ ठिकाणी आंदोलन केले. या वेळी बहुतांश ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत विद्यार्थी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. रविवारी करण्यात आलेले हे आंदोलन लाक्षणिक होते. राज्य सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली नाही तर आगामी काळात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिला.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त हाेता. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी समाज अंतरांचा नियम पाळत योग्य ती खबरदारी घेतली होती.

भारत टाॅकीज-लालबाग, प्लाझा सिनेमा- दादर, शिवाजी पुतळा- चेंबूर, वरळी नाका- वरळी, गिरगाव चर्च- गिरगाव, कलानगर- वांद्रे, विमानतळ- विलेपार्ले, जोगेश्वरी रेल्वे स्थानक, संगमेश्वर मंदिर, -कुर्ला, दहिसर रेल्वे स्थानक, बरकत नाका- वडाळा, साईबाबा मंदीर- मानखुर्द, गणेश मंदीर, पतंगनगर - घाटकोपर, भटवाडी-घाटकोपर, कन्नमवार नगर- विक्रोळी, आयआयटी -पवई आणि शिवाजी तलाव -भांडूप या ठिकाणी दुपारी ११ ते १ या वेळेत ठिय्या आंदोलने झाली.

सध्या आंदोलने शांततेने होत आहे, आजचे आंदोलन लाक्षणिक आहे. राज्य सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा यापुढे उग्र आंदोलन होईल, असा इशारा राजन घाग यांनी दिला. मराठा समाजाचा शिवसेनेने विश्वासघात केला असून आंदोलन कधी करायचे हे आम्हाला शिवसेनेने शिकवू नये, अशी टीका मराठा क्रांती मोर्चाचे नेते वीरेंद्र पवार यांनी केला. दरम्यान, येत्या काही दिवसांत राज्यात या आंदोलनाचा भडका उडू शकतो. आता सरकार कधी अध्यादेश काढणार याकडे राज्यातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

डबेवाल्यांनी घेतला भाग

मराठा आंदोलन हाेवू नये यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सरकार आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. आजच्या आंदोलनात मुंबईत चाकरमान्यांना जेवणाचे डबे पोच करणारे डबेवाले मंडळींनी भाग घेतला. लालबाग येथील आंदोलनात सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने डबेवाले सहभागी झाले हाेते.

औरंगाबादसह राज्यभर आंदोलन...

मराठा आरक्षण कायम ठेवावे यासह इतर मागण्यांसाठी औरंगाबाद शहरासह राज्यात विविध ठिकाणी मराठा क्रांती माेर्चा व मराठा क्रांती ठाेक माेर्चाच्या वतीने आंदाेलने करण्यात आली. रविवारी विद्यापीठ गेटसमोर काही कार्यकर्त्यांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींची होळी केली, तर क्रांती चौकात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला.

बातम्या आणखी आहेत...