आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षणासाठी शरद पवारांचे नातू मैदानात:विवेकच्या आत्महत्येनंतर मनात जी ज्योत पेटली आहे ती संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करु शकते; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका करणार दाखल

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थिगिती आणली यानंतर मराठा बांधवांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. तर राज्य सरकार यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे.

पार्थ पवारांनी मराठा आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही असे म्हटले आहे. बीडमधील तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. यानंतर पार्थ पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. पार्थ पवार यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

बीडमधील तरुणाच्या आत्महत्येविषयी पार्थ पवार म्हणाले की, 'मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केली. ही बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांनी जागे होऊन लढायला हवे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी जागे व्हावे ही विनंती' असे ते म्हणाले. तसेच या ट्विटसोबत त्यांनी आत्महत्या करणाऱ्या विवेकचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याच्या सुसाइड नोटचाही फोटो शेअर केला आहे.

सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा...
विवेकच्या आत्महत्येविषयीच्या ट्विटला रिट्विट करत पार्थ पवारांनी आणखी एक ट्विट केले. ते म्हणाले की, 'विवेकच्या आत्महत्येमुळे आमच्या मनात जी ज्योत पेटली आहे ती संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करु शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्याकडे उरला नाही' असेही ते म्हणाले आहेत.

तसेच 'मराठा आंदोलनाची धगधगती मशाल ह्रदयात पेटलेली ठेवून मी विवेक आणि इतर अनेक लाखो तरुणांसाठी न्यायाची मागणी करण्यास मी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र' असे ट्विट पार्थ पवारांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...