आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा आरक्षण तसेच समाजाच्या इतर मागण्यांची पूर्तता राज्य शासनाकडून होत नसल्याने तसेच शासनाने मराठा क्रांती मोर्चासोबत झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची मागील आठ महिन्यांपासून अंमलबजावणी होत नसल्याने २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा क्रांती मोर्चातर्फे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असून त्याकरिता पुणे जिल्ह्यातून हजारो बांधव सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोंढरे म्हणाले, राज्य शासनाने मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण न्यायालयात बाद केले असून त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यांनी दाेन्ही आरक्षणातील सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशातील त्रुटी दुरुस्त केल्या पाहिजेत, परंतु सरकार पळ काढत असल्याचे दिसते. मराठा आरक्षणासंदर्भात न्या. दिलीप भाेसले यांच्या समितीने दिलेल्या शिफारशी शासनाने गांभीर्याने घेतल्या नसल्याचे दिसून येते.
ईएसबीसी व एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या, परंतु अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्तीबाबत काेणतीही ठाेस कारवाई केलेली नाही. सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी एक हजार काेटींचा निधी मागितला असता ताे टप्प्याटप्प्याने देऊ, असे सांगण्यात आले. परंतु अद्याप काेणताही आराखडा तयार करण्यात आला नाही. मराठा समाजाच्या तरुणांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तत्काळ सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला, परंतु ठाणे येथील अपवाद वगळता काेणतेही वसतिगृह सुरू झाले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.