आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि यानंतर मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाल आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजप खासदार उदयनराजे भोसले हे देखील आग्रही आहेत. दरम्यान आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी भाजप खासदार उदयनराजे भोसलेंवर जोरदार टीका केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली आहे. “एक राजा तर बिनडोक आहे, असं मी म्हणेन, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा असं म्हणतात’ अशा शब्दात प्रकाश आंबेडकर उदयनराजेंवर टीका केली. तर संभाजीराजे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'दोन्ही राजांचा मराठा आरक्षणप्रश्न बंदला पाठिंबा असल्याचे वाचनात कुठेही आलेले नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. मात्र ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचे दिसत आहे. ज्या माणसाला राज्य घटना माहिती नाही. ‘आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा’, अशी ते भूमिका मांडतात. त्यावरून त्यांना भाजपने राज्यसभेवर कसे पाठवले? हाच प्रश्न उपस्थित होतो' असा टोलाही त्यांनी उदयनराजेंना लगावला आहे.
मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा
दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीकडूनही पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात याची घोषणा केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने 10 ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी दोन्ही राजाने नेतृत्व करावे, अशी मागणी केली आहे. त्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.