आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:मंत्रालयालसमोर काळे झेंडे घेऊन आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मंत्रालय परिसरात चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभर मराठा समाजामध्ये असंतोष आहे. अशात सरकारच्या विरोधात ठिक-ठिकाणी आप-आपल्या पद्धतीने रोष व्यक्त केला जात आहे. तर काही ठिकाणी आंदोलन होणार अशा घोषणा सुद्धा करण्यात आल्या आहेत. त्यातच मुंबईत राज्य सरकारचा विरोध करताना मंत्रालयावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी येत आंदोलकांना ताब्यात घेतले.

मराठा आरक्षण हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नाकार्तेपणामुळे रद्द झाले आहे. याला मुख्यमंत्री आणि मंत्री जबाबदार असल्याचे मत देखील या आंदोलकांनी व्यक्त केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्याची मागणी या आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.

मराठा आरक्षणावर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही, तर महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या घरावर 'काळे झेंडे लावा' असे आंदोलन केले जाणार आहे. मराठा ठोक मोर्चाच्या वतीने सोमवारी मंत्रालयासमोर काळे झेंडे लावले जाणार होते. पण आधीच त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर मंत्रालय परिसरात चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...