आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा आरक्षणावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आता उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. येत्या 26 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासाठी आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. ते आज मुंबईतील पत्रकारांनी बोलत होते.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तपण्याची शक्यता आहे. येत्या 26 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आपण आमरण उपोषण करणार असल्याची इशारा संभाजीराजेंनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. संभाजीराजे हे एकटेच आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे. मराठा समाजाला, गरीब घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी हे आंदोलन करत आहे, असे संभाजीराजे म्हणाले.
पुढे संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजातील गरीब लोकांना मी न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करत आहे. 5 मे 2021 रोजी मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. त्यानंतर मी सर्व घटकांना एकत्र घेऊन समाजासमोर गेलो. आपले आरक्षण कसे रद्द झाले? आपण कशा पद्धतीने पुढे गेले पाहिजे? हे समजून सांगण्यासाठी मी राज्यातील प्रत्येक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या दारात गेलो. हात जोडून त्यांना विनंत्या केल्या. मराठा समाजातील नागरिकांना आणि राज्यातील सर्व नागरिकांना याबाबत सांगत आलो.
माझी भूमिका वेळोवेळी मी त्यांच्यासमोर मांडली. आरक्षण रद्द झाल्यानंतर मी पुनर्विचार याचिका दाखल करा असे सांगितले होते. ती दाखल केल्यानंतर सध्या त्याबाबत काय स्टेट्स आहे, हे माहित नाही. याबाबत भोसले समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठा समाजाचे जोपर्यंत सामाजिक मागासलेपण सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावे, अशी मागणी संभाजीराजेंनी यावेळी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.