आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूक मोर्चा:मराठा आरक्षण आणि समाजाच्या मागण्यांविषयी सरकार सकारात्मक, उद्या वर्षावर होणार महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापुरात संभाजीराजेंच्या उपस्थितीमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येत समाज बांधवांनी या आंदोलनात हजेरी लावली. या आंदोलनानंतर आता राज्य सरकारकडून संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. दरम्यान मराठा आरक्षण आणि समाजाच्या मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असल्याचे दिसत आहे.

छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकानी ज्या मागण्या मांडल्या आहेत. त्या मागण्यांविषयी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, नाम. अशोक चव्हाण, नाम. सतेज पाटील यांची उपस्थिती असणार आहे. या बैठकीस छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहणार असून यावेळी संभाजीराजे यांचेसमवेत महाराष्ट्रातील प्रमुख समन्वयक देखील या बैठकीस उपस्थित असतील.

दरम्यान आज संभाजी राजेंनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मूक मोर्चा केला. दरम्यान मराठा मूक मोर्चाची सांगता करण्यात आली. मोर्चानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सरकार सकारात्मक पाऊले टाकत आहे. आम्हीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत, असे संभाजीराजे यावेळी म्हणाले.

मी एकटा चर्चेसाठी जाणार नाही
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. पण मी एकटा चर्चेला जाणार नाही. मराठा समन्यवक ठरवतील चर्चेसाठी कोण जाणार आहे, त्यानंतर चर्चेसाठी जाण्याबद्दल निर्णय घेऊ. आम्ही सरकारला अनेक पर्याय दिले होते. पण, त्याबद्दल फारसे कुणी बोलले नाही. आमचा सर्वांचा अभ्यास झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि इतर मंत्री आपल्या भेटीसाठी तयार आहे. त्यांनी आपल्यासाठी चर्चेसाठी दारे उघडली आहेत, ही आपल्यासाठी चांगली बाब आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.