आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत पाटलांची माहिती:मराठा विद्यार्थ्यांना एससी, एसटी आणि ओबीसीप्रमाणे निर्वाह भत्ता; वर्षाला 60 हजार रुपये मिळणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला ६० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतिगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या एनसीईआरटीमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत लक्षित गटातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत दरमहा ८०० प्रमाणे वार्षिक ९ हजार ६०० रुपये लाभ देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.

शैक्षणिक साहित्यासाठी ५० हजार रुपये देणार देशातील २०० नामांकित विद्यापीठ, संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख इतक्या मर्यादेत आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत शैक्षणिक साहित्यासाठी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...