आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:मराठा तरुणांचे मुंबईत आंदोलन, वाहन मोर्चा कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोकरीत नियुक्ती न मिळालेल्या 2,185 युवक-युवतींचे उपोषण

मराठा आरक्षणाच्या कायद्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वी निवड झालेल्या, मात्र कामावर रुजू करून न घेतलेल्या २,१८५ मराठा समाजातील तरुणांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सोमवारी राज्यातून हजारो वाहनधारकांचा मोर्चा मुंबईत धडकणार असल्याने रविवारी मुंबईच्या वेशीवर वाहने अडवण्यात येत होती.

मराठा आरक्षण कायद्यास ९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. मात्र त्यापूर्वीच राज्यात नोकरभरती सुरू झाली होती. या कायद्यांतर्गत मराठा समाजातील २ हजार १८५ युवक व युवतींची विविध खात्यात निवड करण्यात झाली होती. मात्र नियुक्ती देण्यात न आल्यामुळे त्यांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते विधानभवनावर सोमवारी वाहन मोर्चा आणणार आहेत. सरकारने रविवारी संशयित वाहनांची मुंबईच्या वेशीवर धरपकड चालवली आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी केला आहे. दरम्यान, मराठा समाजाला महाविकास आघाडी सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

मुलुंड नाक्यावर नाकेबंदी
वाहन मोर्चासाठी राज्यभरातून येणाऱ्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी मुलुंड नाक्यावर नाकेबंदी करण्यात आली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser