आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कलाकार राजकारणात:मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे लवकरच उतरणार राजकारणात, 7 जुलैला करणार राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • . खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये 7 जुलै रोजी त्यांच्या पक्षप्रवेशाचा होणार असल्याच्याची चर्चा आहेत

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या आता राजकारणात उतरणार आहेत. त्या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये 7 जुलै रोजी त्यांच्या पक्षप्रवेशाचा होणार असल्याच्याची चर्चा आहेत. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना त्यांनी ही माहिती दिली आहे. 

प्रिया बेर्डे यांच्यासह अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. 

दरम्यान याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्रिया बेर्डे यांनी बातमीला दुजोरा दिल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास मला चित्रपटसृष्टीत पडद्यामागे राहून काम करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करता येईल, असे प्रिया बेर्डे म्हणाल्या. 

0