आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्यांवरील हल्ल्यानंतर केदार शिदेंचा संताप:म्हणाले- वर्षानुवर्षे मांडीला मांडी लावून एकत्र बसलात, पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसैनिकांकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांना शनिवारी धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. गोंधळात सोमय्या हे पायऱ्यांवरुन खाली पडल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकारावरुन मराठी दिग्दर्शन केदार शिंदे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले केदार शिंदे?
वर्षानुवर्षे मांडीला मांडी लावून एकत्र बसलात. आता प्रत्येक गोष्टी मधे एकमेकांवर धावून जाताय? पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल. आम्ही फक्त युत्यासारख्या घटना पाहायच्या!! #लोकशाही,” असे ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

नेमके काय घडले होते?

जम्बो कोविड सेंटरमधील कथित भ्रष्टाचारासंदर्भात निवेदन देण्यासाठी निघालेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सोमय्या महानगरपालिका इमारतीत प्रवेश करीत असताना आधीच दबा धरून बसलेले शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी सोमय्या यांना घेराव घालून धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमुळे सोमय्या पायऱ्यांवरून पडले. त्यांच्या माकडहाडाला मुकामार लागला असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महापालिका इमारतीत प्रवेश करताच शिवसैनिकांनी साेमय्यांना अडवले. “तुम्ही केवळ महाविकास आघाडी सरकारच्या विराेधात आराेप करता. भाजपची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढा,’ अशी मागणी शिवसैनिकांनी केली. या वेळी शिवसैनिक अधिक आक्रमक हाेत गेले. अंगरक्षक आणि पाेलिसांनी सोमय्यांना घेरावातून बाहेर काढले. परंतु या धक्काबुक्कीत ते पायऱ्यांवरून पडले. त्यांना पाेलिसांनी वाहनात बसवून महापालिकेच्या आवाराबाहेर नेले. त्या वेळीदेखील शिवसैनिकांनी जाेरदार घाेषणाबाजी करीत, गाडीवर हाताने बुक्के मारत गोंधळ घातला.धक्काबुक्कीनंतर साेमय्या खासगी रुग्णालयात दाखल झाले.

हा प्रकार समजल्यानंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात माेठ्या संख्येने हजर झाले. त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावी, अशी मागणी करीत ठाण मांडले.

कायदेशीरपणेच उत्तर देऊ - पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सायंकाळी सोमय्या यांची रुग्णालयात भेट घेतली. या वेळी हल्लेखोरांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला. “किरीट साेमय्या यांच्यावर यापूर्वीदेखील हल्ले झाले हाेते. ते कधीच घरी बसले नाहीत. हल्ला केला म्हणून सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भारतीय जनता पक्ष कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल,’ असा इशारा त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...