आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Marathi Drama । Preliminary Round Of 60th Amateur Marathi Drama Competition From 1st January 2022, Send Entries Till State Drama Competition 30

दिव्य मराठी विशेष:60 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 1 जानेवारी 2022 पासून, राज्य नाट्य स्पर्धा 30 पर्यंत प्रवेशिका पाठवा

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या १ जानेवारी २०२२ पासून सुरू होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. ६० व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी १ फेब्रुवारी २०२२ पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. नाट्य स्पर्धेकरीता तीन हजार रुपयांचा अनामत धनादेश स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे.

प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतील.

आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 30 नोव्हेंबर, २०२१ पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

या ठिकाणी सादर करा प्रवेशिका
मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-३२ (०२२-२२०४३५५०) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

पुणे विभागातील संस्थांनी, सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-४, विमानतळ रोड, पुणे (०२०-२६६८६०९९) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

औरंगाबाद विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर-०२, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद- ४३१००५ (८७८८८९३६९०) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

नागपूर व अमरावती विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर-४४०००१ (०७१२-२५५४२११) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

बातम्या आणखी आहेत...