आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओटीटी प्लॅटफॉर्म:नेटफ्लिक्स, अॅमेझॉनशी स्पर्धा करणार मराठी, गुजराती ओटीटी

मुंबईएका महिन्यापूर्वीलेखक: मनीषा भल्ला
  • कॉपी लिंक
  • पंजाबीमध्येही तीन ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच होण्याच्या मार्गावर आहेत.

नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, डिस्ने हॉटस्टार आणि सोनी लाइव्हसारख्या इंटरनॅशनल ओटीटी प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रादेशिक भाषांचा मजकूर अर्धा टक्काही नाही. मात्र, प्रादेशिक भाषांची व्याप्ती पाहा - तो मजकूर वाढवला जात आहे. या आंतरराष्ट्रीय प्लॅटफाॅर्मशी स्पर्धा करण्यासाठी प्रादेशिक भाषांत ओटीटी प्लॅटफॉर्म स्पर्धत उतरत अाहेत. पुढील महिन्यात मराठीचा पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच होईल. पंजाबी भाषेतही दोन-तीन ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच होत आहेत. चित्रपट निर्माते आणि ओटीटीचे अभ्यासक गिरीश वानखेडे यांच्यानुसार, तेलगूमध्ये “आहा’, मल्याळमच्या “नीसस्ट्रिम’, बंगालीत “हॉयचॉय’च्या यशानंतर प्रादेशिक भाषांतील प्लॅटफॉर्म वाढू लागले आहेत.

पीडब्ल्यूसीच्या अहवालानुसार, ओटीटी क्षेत्रात वेगाने वाढत होत असलेला भारत जगातील सहावा देश आहे. याची व्याप्ती पाहता आता प्रादेशिक कंपन्याही यात उतरत आहेत. पुढील महिन्यात लाँच होत असलेला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म “प्लॅनेट मराठी’चे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी गेल्या वर्षी अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांच्यासोबत “एबी आणि सीडी’ चित्रपट तयार केला. तो प्रदर्शित होण्याच्या वेळी लॉकडाऊन लागला. त्यामुळे चित्रपट नाइलाजाने अॅमेझॉन प्राइमला विकावा लागला.

यातूनच मराठी ओटीटीची कल्पना सुचल्याने त्यांनी सांगितले. गेल्या १ वर्षापासून चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे ओटीटी हा योग्य पर्याय वाटल्याने बर्दापूरकर म्हणाले. यावर मराठी वेब मालिकांसह चित्रपट, चॅट शो दाखवले जातील. अशातच लाँच झालेल्या “ओहो गुजराती’चे सीईओ परिमल मोदी यांच्यानुसार, ७ मे रोजी सुरू झालेल्या या ओटीटी प्लॅटफॉर्मचे आतापर्यंत ३५ हजार सबस्क्रायबर झाले आहेत. या ओटीटीकडे सुमारे ७०० गुजराती चित्रपट आहेत. पंजाबीमध्येही तीन ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच होण्याच्या मार्गावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...