आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाताळ सुरू होऊन नव्या वर्षापर्यंत चालणाऱ्या फेस्टिव्ह सीझनमुळे स्थानिक पर्यटन उद्योगात प्रचंड उत्साह दिसत आहे. बहुतांश प्रसिद्ध पर्यटन स्थळांसाठी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ४००% वाढ दिसत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन आल्याने पर्यटन क्षेत्र, टूर्स-ट्रॅव्हल आणि इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये चिंता होती. आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी वाढल्याने इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आईएटीओ) निराश झालेत. मात्र या अडचणींतही स्थानिक पर्यटन उद्योग रुळावर येत आहेत.
डिसेंबरमध्ये देशांतर्गत हवाई भाडे ३०% आणि आंतरराष्ट्रीय भाड्यात ५०% वाढ झाल्यानंतरही नाताळ आणि नवीन वर्षाचा उत्सव साजरा करण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंग चार पट वाढले. ईजमायट्रिपचे सहसंस्थापक रिकांत पित्ती यांनी सांगितले की, मागील वर्षाच्या तुलनेत या वेळी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वेडिंग डेस्टिनेशनचे बुकिंग १००% पर्यंत अधिक आहे. गुलमर्ग, गोवा, उदयपूर, जयपूर, मसुरी, सिमला, नैनीताल, कॉर्बेट, ऋषिकेश आणि पोर्ट ब्लेअरसाठी बुकिंग वाढले आहे. राजा-राणी ट्रॅव्हल्सचे चेअरमन अभिजित पाटील म्हणाले की, गुलमर्गची हाॅटेल्स पूर्णपणे बुक आहेत. आता पर्यटक पहलगामकडे वळले आहेत. तेथेही ९०% बुकिंग झाले. सुमारे ६०% हाऊसबोट बुक आहेत. जम्मू-काश्मिरात फॅमिली टुरिस्ट्सचे प्रमाण अधिक आहे.
काश्मीर आणि हिमाचलकडे सर्वाधिक कल
- इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स, महाराष्ट्राचे चेअरमन जितेंद्र केजरीवाल म्हणाले, देशांतर्गत बाजारात कोरोनाची पूर्वीप्रमाणे भीती नसल्याने पर्यटनात तेजी दिसत आहे.
- जेम ट्रॅव्हल्सचे वीरेन व्होरा म्हणाले, दक्षिण आफ्रिकेसाठी आमच्याकडून चांगले बुकिंग सुरू होते. दिवाळीत ६०-६० लोकांचे दोन जथ्थे आफ्रिकेला गेलेही होते. परंतु नवा व्हेरिएंट आणि निर्बंधांमुळे डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचे बुकिंग रद्द करावे लागले. तथापि, स्थानिक बुकिंग मात्र अजूनही सुरूच आहे.
- महाराष्ट्रातून एकूण होणाऱ्या बुकिंगमध्ये ४०% जम्मू-काश्मीरसाठी होत आहे. तर ६० % हिमाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयात जाऊ इच्छितात. {देशाच्या जीडीपीत पर्यटन क्षेत्राचे योगदान ५ % आणि रोजगार निर्मितीत १२ टक्क्यांहून अधिक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.