आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुस्लिम समाजासाठी आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी एमआयएमकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी मुंबईतील चांदिवली येथे एमआयएमची सभा पार पडली, त्यात खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अविवाहित मुलांसाठी एक वक्तव्य करत सल्ला दिला आहे. लग्न करणार ना? अविवाहित राहू नका, अविवाहित लोकं खूप त्रास देतात. असे एमआयएम प्रमुख ओवेसी यांनी म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे.
शनिवारी चांदिवली भागात एमआयएमकडून तिंरगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात औरंगाबाद, मालेगाव येथून मुंबई पर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली होती. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबईत भाषण दिले. रॅलीदरम्यान ओवेसी यांनी मुस्लिम तरुणांना विचारले की, त्यांची मुले अशिक्षित आणि गरीब असावीत का?…जे 18 ते 19 वयोगटातील तरुण मुले आहेत. ते लवकरच विवाह करतील आणि त्यांना मुले होतील, तुम्ही विवाह करणार ना, असा प्रश्न ओवेसींनी विचारला. तुमच्या मुलांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवायचे आहे का? अविवाहित राहू नका, अविवाहित लोकं खूप त्रास देतात. घरात राहिल्यास माणसाचे मनही शांत राहते. असा चिमटा ओवेसी यांनी काढला.
पॉलिटिकल सेक्युलॅरिझमला मानत नाही
यावेळी ओवेसी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून काँग्रेसला धारेवर धरले. तुम्हाला धर्मनिरपेक्षता दाखवली गेली. भारतातील मुसलमानांना विचारतो धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला काय मिळाले? धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला केवळ घोषणा दिल्या, आश्वासने दिले, पण आरक्षण मिळाले नाही, मशीद मिळाली नाही. मशिद पाडणाऱ्यांनी शिक्षा मिळाली नाही. न्याय मिळाला नाही. आपण केवळ संविधानातील सेक्युलॅरिझमला मानतो. मी पॉलिटिकल सेक्युलॅरिझमला कधीच मानत नव्हतो आणि मानणार नाही. मुसलमानांनो पॉलिटिकल सेक्सुलॅरिझम धुडकावून लावा. तुम्हाला शासन कर्ती जमात बनायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.