आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Marathi News | BJp | Mim | BJP And MIM Are Two Sides Of The Same Coin; Why Were Two MIM MLAs Silent On Reservation For Five Years? Nasim Khan

आरक्षण फडणवीस सरकारमुळे खोळंबले:बीजेपी आणि एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू; आरक्षणावर एमआयएमचे दोन आमदार पाच वर्षे गप्प का होते?- नसिम खान

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिमांना दिलेले आरक्षण फडणवीस सरकारमुळे खोळंबले
  • एमआयएम व भारतीय जनता पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू

काँग्रेस आघाडी सरकारने 2014 साली मुस्लिम समाजाला महाराष्ट्रात 5 टक्के आरक्षण दिले होते. या निर्णयास मुंबई हाय कोर्टानेही मान्यता दिली होती परंतु त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. मुस्लिम आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असताना एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते परंतु पाच वर्षे हे आमदार मुस्लिम आरक्षणावर गप्प का बसले? फडणवीस सरकारला कधीही जाब का विचारला नाही? असा घणाघाती आरोप माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरीफ मोहम्मद नसीम खान यांनी केला आहे.

एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांचा समाचार घेताना नसीम खान म्हणाले की, मी अल्पसंख्याक मंत्री असताना मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजालाही आघाडी सरकारने आरक्षण दिले होते. परंतु त्यानंतर भाजपा सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. पाच वर्ष काँग्रेस पक्ष मुस्लिम आरक्षणासाठी फडणवीस सरकारशी संघर्ष करत होता त्यावेळी एमआयएमने या आरक्षणाबद्दल तोंडातून एक शब्द काढला नाही. उलट एमआयएमच्या दोन्ही आमदारांनी मुस्लिमांना आरक्षण न देणा-या फडणवीस सरकारची सातत्याने मदतच केली. निवडणूक आल्यावरच एमआयएमला मुस्लिम आरक्षण आठवते, निवडणुक संपली की यांना आरक्षण आठवत नाही, असा टोलाही नसीम खान यांनी लगावला. भाजपा व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे नसीम खान म्हणाले.

मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच आग्रही राहिला आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’चा नारा देणाऱ्या परंतु समाजात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करुन सत्तेचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला एमआयएम साथ देत असते. एमआयएमला राज्यातील मुस्लिम समाज थारा देत नाही. एमआयएमची भूमिका ही नेहमीच भाजपाला अनुकुल राहिली आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, येथे येऊन ओवेसींनी मुस्लिम समाजाला भडकावण्याचे प्रयत्न करुन नयेत. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबध्द आहे.

मुंबई महानगरपालिका आणि राज्यभरातील नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर ओवेसींना मुस्लिमांचा विकास आणि आरक्षण आठवले. आरक्षणावरून आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या असदुद्दीन औवेसी यांनी व त्याच्या एमआयएम पक्षाने मुस्लिम समाजासाठी काय केले? या हिशोब द्यावा असा सवाल करून महाराष्ट्रातील मुस्लिम समाज सुज्ञ असून एमआयएमला पुरता ओळखून आहे त्यांना थारा देणार नाही, असेही नसीम खान म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...