आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराम्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला होता. असे म्हणता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पेपरफुटीवर आपले स्पष्टीकरण दिले. आज म्हाडाची परीक्षा होणार होती, त्यापुर्वी आव्हाड यांनी रात्री ट्विट करत परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले, त्यानंतर राज्यात विरोधात बसलेल्या भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच परिक्षेसाठी लांबून आलेल्या विद्यार्थ्यांनीही राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर आज दुपारी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिले.
आव्हाड म्हणाले की, म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला होता. पेपर फोडण्याआधीच पोलिसांनी पेपरफुटीतील टोळीला पकडले. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीतील आरोपींच्या संवादात म्हडाच्या प्रश्नपत्रिकेचा उल्लेख झाला होता. म्हाडाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हाडाच्या भरतीच्या परीक्षेतेचा पेपर कुठेही फुटला नाही, त्याआधीच कारवाई करण्यात आली. म्हाडाच्या पेपरसंदर्भात फक्त एकाच व्यक्तीला माहिती होती, तरीही पेपर कसा फुटला? म्हाडाच्या परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
परीक्षा जानेवारीत
आज म्हाडासाठी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ही परीक्षा आता जानेवारी महिन्यात होईल अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. या परीक्षेसाठी आज सकाळच्या सत्रात 50 हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते.
मध्यरात्री ट्विट करत परिक्षा रद्द
जितेंद्र आव्हाडांनी मध्यरात्री अचानक ट्विट करत परीक्षा रद्द झाल्याचे सांगितल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम वाढला. राज्यभरातून आज अनेक विद्यार्थी परिक्षेसाठी राज्यातील अनेक भागात गेले होते. मात्र तिथे गेल्यानंतर त्यांना कळले की, परीक्षा रद्द करण्यात आली. एसटी बससेवा बंद असल्याने आज अनेक उमेदवार खाजगी वाहनांने परिक्षा केंद्रावर पोहोचले आहेत, त्यासाठी त्यांना जास्तीचे पैसे देखील खर्च करावे लागले. याची भरपाई कोण देणार असा प्रश्न उमेदवारांकडून विचारला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.