आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उद्या 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. पवारांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त लेखक, पत्रकार सुधीर भोंगळे यांच्या 'नेमकचि बोलणे' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शरद पवारांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.
आजच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांची उपस्थिती होती. त्यादरम्यान पुस्तकातील भाषणांचा काही भाग वाचण्यात आला. त्यानंतर त्या-त्या वेळी शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी अभिनेता, कवी किशोर कदम यांनीही पवारांबद्दलचा किस्सा सांगितला. त्यानंतर किशोर कदम यांनी सर्वांना पडणारा प्रश्न शरद पवारांना विचारला. तो प्रश्न होता, शरद पवार सर्वांना नावानिशी कसे ओळखतात? आम्ही नट असून पाठांतरात कमी पडतो, तुम्ही नावे कशी लक्षात ठेवता? त्यावर शरद पवांनी भन्नाट गोष्ट सांगितली.
शरद पवार म्हणाले की, "राजकारणात फार कमी कष्टाने आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळते, फक्त तुम्ही समोरच्या माणसाचे नाव लक्षात ठेवा. मी मुख्यमंत्री असताना एक महिला मला भेटायला आली. ती माझ्या मतदारसंघातली होती. तिचे काहीतरी काम होते. मी तिला म्हेलं, काय गं कुसूम मुंबईला कशी, काय चाललंय? तर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारली काम होवो न होवो, अशी तिची भावना होती. लोकांचे खूप छोट्या गोष्टीत सुख असते.
या गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत. अशा दोन व्यक्ती महाराष्ट्रातल्या राजकारणात होत्या. पहिले यशवंतराव चव्हाण आणि दुसरे वसंतदादा पाटील. या दोघांनाही कितीही जुना माणूस भेटला तरी ते नाव लक्षात ठेवायचे. या गुणामुळे समाजामध्ये कायमस्वरुपी स्थान प्राप्त व्हायचे यश मिळते. असा राजकीय सल्ला पवारांनी यावेळी कार्यक्रमात दिला.
'नेमकचि बोलणे' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला शरद पवाराची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याशिवाय, शिवसेना खासदार संजय राउत, रंगनाथ पठारे, कवी किशोर कदम, सुधीर भोंगळे उपस्थित होते. तर डॉ. विजय केळकर ऑनलाईन सहभागी झाले होते. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे आदी सभागृहात उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.