आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमसोबत युती नकोच:शिवसेनेसोबत युती करेल पण एमआयमसोबत नाहीच! महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांची स्पष्टोक्ती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेसोबत युती करायला तयार आहेत पण एमआयएमसोबत नाही. असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. 2022 मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

तीन पक्ष मिळून जानेवारीच्या मध्यापर्यंत जागावाटप जाहीर करणार असल्याची घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले. यासोबतच आणखी काही पक्ष देखील आमच्यासोबत येत आहेत. त्यानुसार आम्ही आमच्या जागा वाटप करणार आहोत. उद्या आम्ही प्रचाराला सुरूवात करत आहोत. अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली आहे.

उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जे करत आहे ते घटनाविरोधी

निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही. मात्र उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जे करत आहे ते घटनाविरोधी असल्याचे मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले आहे. वारंवार कोरोनाच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलणे हे चुकीचे आहे. आणीबाणी जरी घोषित होणार असेल तरी निवडणूका पुढे ढकलता येत नाहीत, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केले.

काँग्रेससोबत युती करण्यास तयार
काँग्रेस सोबत युती करायला आम्ही तयार आहोत. आम्ही त्यांना सतत म्हटले होत की, तुम्ही ज्या जागा हरलेल्या आहात त्या आम्हाला द्या अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या मनात भीती आहे की हरलेल्या जागा हे जिंकतात त्यामुळे आपले पुढे जाऊन काय होणार? असा त्यांना प्रश्न सतावत आहे. त्यामुळे ते युती करायला घाबरत आहेत. म्हणूनच आम्हाला भाजपची बी टीम काँग्रेस वारंवार म्हणत आहे. मात्र आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही एमआयएम सोबत महापालिका निवडणूक लढवणार नाही. आम्ही शिवसेनेसोबत युती करायला तयार आहोत परंतु ते आमच्या सोबत येतील का? हा प्रश्न आहे. आम्ही सेक्युलर पार्टीसोबत युती करायला तयार आहोत. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...