आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी वसुली प्रकरण:सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांना दिली क्लीनचीट; चांदीवाल आयोगासमोर वाझेचा मोठा खुलासा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या 100 कोटी वसुली प्रकरणात अडकले असून, त्या प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. निलंबीत पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिली आहे. देशमुख यांनी कधीही पैशांची मागणी केली नसल्याचे वाझे यांनी आज चांदीवाल आयोगासमोर म्हटले आहे.

मुंबई पोलिस आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यानंतर तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले होते. या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर आरोप लावले होते. त्यात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना 100 कोटी वसुली करण्याचे सांगितल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला होता. त्यानंतर अनिल देशमुखांना राजीनामा देत खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली होती, राज्य सरकारने परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदीवाल आयोगाची नेमणूक केली आहे.

सचिन वाझेंनी जबाब नोंदवला
अनिल देशमुखांनी कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी केलीच नव्हती असा जबाब आज सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगासमोर नोंदवला आहे. अनिल देशमुख यांचे वकिल गिरीश कुलकर्णी यांनी वाझेंची उलट तपासणी केली असता, त्यावेळी वाझेंनी देशमुखांकडून किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी करण्यात आलेली नाही. असे जबाब सचिन वाझेंनी नोंदवला आहे. बार चालकांकडून किंवा त्यांच्याशी संबंधितांकडून आपण कोणत्याही प्रकारे पैसे घेतले नसल्याचे देखील वाझेंनी आज चांदीवाल आयोगाकडे म्हटले आहे.

पुढील सुनावणी 21 डिसेंबरला
अनिल देशमुखांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केली आहे, आज 100 कोटी वसुली प्रकरणी सचिन वाझेंनी आपला जबाब नोंदवला असून, पुढील सुनावणी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...