आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Marathi News | Sameer Wankhede Caste Certificate | SC Organizations File Complaint Against Zonal Director NCB Sameer Wankhede For Alleged Fake Caste Certificate Latest News And Updates

वानखेडेंच्या अडचणीत वाढ:दलित संघटनांकडून समीर वानखेडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल, नोकरी मिळविण्यासाठी जातीची खोटी माहिती दिल्याचा आरोप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

NCB अर्थात अमली पदार्थ नियंत्रण मंडळाचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अंतर्गत चौकशीला सामोरे जाणाऱ्या वानखेडे यांच्या विरोधात आता दलित संघटनांनी तक्रार दाखल केली आहे. समीर वानखेडे यांनी नोकरी मिळविण्यासाठी आपण एससी प्रवर्गातून असल्याची खोटी माहिती दिली असा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

कुणी दाखल केली तक्रार?

स्वाभीमानी रिपब्लिकन पार्टी आणि भीम आर्मी अशी तक्रार दाखल करणाऱ्या दोन संघटनांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे प्रत्यक्षात मुस्लिम असल्याचा दावा केला. त्यांनी अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून असल्याची खोटी माहिती दाखल करून जात प्रमाणपत्र बनवले. याच प्रमाणपत्रातून इंडियन रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये नोकरी मिळवली असा आरोप आहे. याच आरोपांवरून दलित संघटनांनी आता तक्रार दाखल केली आहे.

नवाब मलिकांनी केले होते आरोप

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक वानखेडे यांच्याविरुद्ध नव-नवीन खुलासे करत आहेत. त्यांनी आपले म्हणणे पटवून देण्यासाठी ट्विट आणि फोटोंची मालिका सुद्धा लावली. यातून समीर वानखेडे मुस्लिम आहेत, त्यांनी आर्यन खानला पकडून त्याला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी केली. तसेच वानखेडे लाखो रुपयांचा बूट आणि शर्ट घालतात असे विविध आरोप केले.

मलिक यांनी सांगितल्याप्रमाणे, जन्माच्या दाखल्यावर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद के. वानखेडे आहे. तर NCB च्या वेबसाईटवर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव असे नमूद आहे. केंद्र सरकारची नोकरी मिळविण्यासाठी जन्मापासून मुस्लिम असलेले समीर वानखेडे यांनी आपल्याच वडिलांचे नाव बदलून दलित असल्याचे प्रमाणपत्र बनवले. असे करून त्यांनी दलितांचा हक्का हिरावला असे आरोप मलिक यांनी केले होते. त्याचाच आधार घेत दलित संघटनांनी आता तक्रार दाखल करून न्याय मागितला आहे.

बातम्या आणखी आहेत...