आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपला ऐक्य नको आहे, हे शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितले होते. ते आम्हाला दोन वर्षापूर्वी समजले. देश किती मागे चालला आहे. आता आम्हाला कळत आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राउत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘नेमकची बोलणे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत करण्यात आले. त्यावेळी संजय राउतांनी भाजपवर सडकून टीका केली. शरद पवार यांनी नेहमीच देशाला आणि राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. पवारांचे जे विचार 25 वर्षापूर्वी होते. ते आताही कायम आहेत. त्यांच्या विचारात काहीच बदल झालेला नाही. जेव्हा युतीचे सरकार होते तेव्हा त्यांनी म्हटले होते हे पंताचे सरकार आहे. मुंबईतील जमिनी व्यापाऱ्यांना विकू नका, असे पवारांनी म्हटले होते. मुंबईतील मराठी माणसांची पकड कमी होऊ नये असे त्यांनी सांगितले होते. ही आठवण काढत संजय राउतांनी भाष्य केले.
दारुगोळा वेळ आल्यावर फोडू
आमच्याकडे खूप दारुगोळा आहे, वेळ आल्यावर आम्ही नक्कीच फोडू. मी पवारांना दिल्लीत खुर्ची दिली. त्यावर टीका टिप्पणी होत आहे. मी पवारसाहेबांना खुर्ची का दिली हे समजायच असेल तर त्यांची 61 भाषणे वाचली पाहिजे. 25 वर्षांपूर्वी त्यांनी सांगितले होते की, भाजपला ऐक्य नको आहे. आम्हाला ते 2 वर्षांपूर्वी समजले. देश किती मागे चाललाय हे आम्हाला आता कळू लागले आहे. आज प्रश्न विचारणाऱ्यांची स्थिती काय आहे हे सर्वांना माहीत आहे. असे राउत म्हणाले.
मोदींना पुस्तक पाठवायला हवे
भाजप देशाचे तुकडे-तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे. हे पवारांनी 1996 मध्ये सांगितले होते. ते आता आम्हाला कळू लागले आहे. हे पुस्तक आपण मोदींना पाठवायला हवे. महाराष्ट्र हा देशाला विचार देत असतो. ‘नेमकची बोलणे’ हे पुस्तक पंतप्रधान मोदींना पाठवायला हवे, असे राउत म्हणाले. या ग्रंथाला भगवा कलर घातला. मी आपला आभारी आहे. अवघा रंग एकची झाला. देशाचा महाराष्ट्राचा रंग भगवा आहे, असे देखील राउतांनी नमुद केले.
पुस्तकात अशावर भाष्य
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार यांचे योगदान आहे. त्यांनी 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी, केंद्रीय मंत्रिमंडळातील जबाबदारी पार पाडली आहे. राजकीय प्रवासात पवारांनी अनेक सभा आणि मेळावे आपल्या भाषणांनी गाजवले आहेत. याच भाषाणांवर आता पुस्तक येणार आहे. त्यामुळे वाचकांना शरद पवार यांची भाषणे पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.
'नेमकचि बोलणे' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला शरद पवाराची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याशिवाय, शिवसेना खासदार संजय राउत, रंगनाथ पठारे, कवी किशोर कदम, सुधीर भोंगळे उपस्थित होते. तर डॉ. विजय केळकर ऑनलाईन सहभागी झाले होते. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे आदी सभागृहात उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.