आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामिस्टर आणि मिसेस कौशल यांच्या रिसेप्शन पार्टीवर ओमायक्रॉनचे संकट आले आहे. पुढच्या आठवड्यात बी टाउन सेलेब्ससाठी कतरिना आणि विक्की एका भव्य लग्नाच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार होते. त्यासाठी मुंबईत तीन हॉटेल्स देखील शॉर्टलिस्ट करण्यात आल्या होत्या.
मात्र धारावीत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर आता विक्की आणि कतरिनाला मुंबई येण्यापूर्वी बीएमसी अधिकाऱ्यांची परवागणी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बी टाउन सेलेब्रिटींसाठी ठेवलेले रिसेप्शनचे कार्यक्रम सध्या तरी होऊ शकणार नाही. कारण मुंबईत ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. तसेच परराज्यातून आलेल्या नागरिकांची देखील विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर काही मोजकेच जणांना कतरिना आणि विक्कीने आमंत्रण दिले होते. त्यामुळे जे लग्नात येऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी हा रिसेप्शनचा कार्यक्रम खास करून आयोजित करण्यात आला होता. त्यात बॉलीवुडचे वरिष्ठ कलाकार, कतरिना आणि विक्कीचे मित्र या पार्टीत सहभागी होणार होते. मात्र काही दिवसांपासून राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याने, तुर्तास हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
धारावीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधित ओमायक्रॉनची लागण झालेला रुग्ण तंजानिया या देशातून परतलेला आहे. त्याची कोरोनाची चाचणी केली असता, त्यात ओमायक्रॉनचा विषाणू आढळला आहे. त्याला सध्या मुंबईतील सेवन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याने कोरोना लसीचे कोणतेही डोस घेतलेले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.