आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:मराठवाडा वाॅटरग्रीड बंद करण्याचे पाप करणार नाही, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर व पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून ग्रीड प्रस्तावित करणे तसेच उस्मानाबाद जिल्ह्यासाठी उजनी, सीना-कोळेगाव, निम्न तेरणा धरणातून ग्रीड प्रस्तावित करणे यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय ग्रीडच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. हे ग्रीडचे काम बंद करण्याचे पाप आम्ही करणार नाही, असे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मराठवाडा वाॅटरग्रीड उभारण्याचे काम प्रलंबित असल्याचे सांगत हे काम पूर्णत्वाकडे नेण्याची मागणी आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, सुधीर मुनगंटीवार, उदयसिंह राजपूत, राणा जगजितसिंह, किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. त्याला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी प्राथमिक संकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता दिली आहे. मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प तत्काळ सुरू करण्याबाबत शासनाकडे मागणी केली आहे. मंत्रिमंडळाच्या २३ फेब्रुवारी २०२० च्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्यांना जायकवाडीतून ग्रीड प्रस्तावित करणे आदींची कार्यवाही सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...