आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा कसला न्याय?:पतीने बळजबरी संबंध ठेवल्याने पक्षाघात झाल्याचा पत्नीचा आरोप, कोर्टाने म्हटले- पत्नीच्या सहमतीशिवाय संबंध ठेवणे बेकायदा नाही

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्टाने सांगितले - महिलेला अर्धांगवायू होणे दुर्दैवी

वैवाहिक बलात्काराच्या प्रकरणांमध्ये (पत्नीच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे), देशातील दोन न्यायालयांचे वेगवेगळे निर्णय 7 दिवसांत समोर आले आहेत. केरळ हायकोर्टाने 6 ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालात म्हटले की विवाहानंतर पत्नीसोबत बळजबरी शारीरिक संबंध बनवणे क्रूरता आहे तसेच ते घटस्फोटासाठी आधार ठरू शकते. याच दरम्यान मुंबईतील सत्र न्यायालयाने पत्नीच्या मर्जीविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणे बेकायदा नाही.

मुंबईतील एका महिलेने कोर्टात दावा केला होता की तिच्या पतीने बळजबरी शारीरिक संबंध बनवल्यामुळे तिला कंबरेपर्यंत अर्धांगवायूचा धक्का बसला. यासोबतच पीडितेने पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध हुंडाबळीचा आरोप देखील केला होता.

या प्रकरणी आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबियांनी मुळात हा आरोपच खोटा असल्याचे सांगताना अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो कोर्टाने मंजूर केला आहे.

मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी झाली. न्यायाधीश एसजे घरात यांनी सांगितले, की महिलेचे आरोप कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. तसेच जर पती आपल्या पत्नीशी संबंध ठेवत असेल तर त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. त्याने कोणतेही अनैतिक कृत्य केलेले नाही.

कोर्टाने सांगितले - महिलेला अर्धांगवायू होणे दुर्दैवीच
न्यायाधीश म्हणाले की, वैवाहिक बलात्कार हा भारतात गुन्हा नाही. महिलेच्या लकवा झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.पण, यासाठी संपूर्ण कुटुंबाला जबाबदार धरता येणार नाही असे कोर्टाने म्हटले आहे. सोबतच या प्रकरणात अटक करून चौकशीची गरजही नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले. महिलेने हुंडाबळीचा आरोपही केला. परंतु हुंड्यात काय मागितले हे सांगितले नाही.

लग्नाच्या एका महिन्यानंतर बळजबरी सुरू केल्याचा आरोप
पीडित महिलेने दावा केला होता की नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. लग्नाला एक महिना झाला तेव्हा पतीने तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. या दरम्यान, जेव्हा जानेवारीत तिची तब्येत बिघडली तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली आणि तिला कंबरेच्या खालचा भाग निकामी झाल्याचे समजले.

बातम्या आणखी आहेत...