आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्क झुकेरबर्ग यांना धक्का:​​​​​​​मेटाच्या शेअरमध्ये 26% ची घसरण, मार्केट कॅप 2.22 लाख कोटींनी कमी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना त्यांच्या शेअर्सच्या किमतीत मोठ्या प्रमाणात 26% घसरण झाल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 2.22 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही यूएस कंपनीसाठी व्हॅल्यूच्या हिशोबाने ही एक दिवसाची सर्वात मोठी घसरण आहे.

या प्रचंड घसरणीचे सर्व मीम्सही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. रिंकी नावाच्या युजरने रेखाचे एक गाणे शेअर केले आहे, मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो.

फेसबुकचे नाव बदलले
फेसबुकचे नाव आता मेटा झाले आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे झुकेरबर्ग आता जगातील श्रीमंतांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर आले आहे. त्यांची संपत्ती 84.8 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 6.31 लाख कोटी रुपये राहिली आहे. त्यांच्या आधी रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी आहेत. त्यांची संपत्ती 6.69 लाख कोटी रुपये आहे.

टॉप 10 मधून बाहेर पडले
शेअर्सच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे मार्क झुकरबर्ग 2015 नंतर पहिल्यांदाच जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. भारतीय वेळेनुसार गुरुवारी मेटाचे शेअर्स 26% घसरले. एक दिवस आधी कंपनीचा स्टॉक 20% वर होता. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यांची संपत्ती 9 लाख कोटी रुपये होती.

जानेवारीत अनेक श्रीमंतांचे नुकसान
तसे, जानेवारीमध्ये सर्व श्रीमंतांचे नुकसान झाले आहे. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती टेस्लाचे एलोन मस्क यांना जानेवारीत 25.8 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स प्रचंड घसरले होते. त्याआधी नोव्हेंबरमध्ये त्यांना 35 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. यामुळे त्यांची एकूण संपत्ती 315 अब्ज डॉलरवरून आता 232 बिलियनवर आली आहे.

मस्क यांना 3.3 अब्ज डॉलरचे नुकसान
काल मस्क यांना 3.3 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. जेफ बेझोस यांचे 11.9 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. कंपनीने सांगितले की, भारतात डेटाच्या किमती वाढल्यामुळे डिसेंबर 2021 च्या तिमाहीत मेटाची वाढ मर्यादित होती. दूरसंचार कंपन्या एयरटेल, वोडाफोन आयडिया आणि रिलायन्स जियोने देखील डिसेंबर तिमाहीत त्यांच्या किमती 20-25% ने वाढवल्या होत्या.

मेटाचा नफा कमी झाला
मेटाचा नफा डिसेंबर तिमाहीत 8% घसरून 10.28 अब्ज डॉलर झाला आहे. जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत 11.21 अब्ज डॉलर होता. तसे, यूएस स्टॉक मार्केट नैस्डैकने जानेवारीमध्ये 9% ची घसरण नोंदवली. कारण अमेरिकेची सेंट्रल बँक मार्चपासून व्याजदर वाढवण्याचा विचार करत आहे. ते या वर्षात 4-5 वेळा व्याजदर वाढवू शकतात.

झुकेरबर्ग यांची 12.8% हिस्सेदारी
मार्क झुकरबर्ग यांची मेटामध्ये 12.8% हिस्सेदारी आहे. फेसबुकचे मूल्य घसरण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत. जगातील सर्वात मोठी कंपनी Apple ने गेल्या वर्षी काही अपडेट केले होते, ज्यामुळे फेसबुकला यावर्षी किमान 10 बिलियन डॉलरचा तोटा होण्याचा अंदाज आहे.

अॅपल देखील आहे घसरणीचे कारण
एप्रिल 2021 मध्ये, Apple ने iPhone ग्राहकांना कोणते अॅप त्यांचे वागणे ट्रॅक करु शकते याची सुविधा दिली. बहुतेक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आणि त्याला डिसेबल केले. फेसबुकचे सीएफओ डेव्हिड वेहनर म्हणतात की याचा परिणाम फेसबुकच्या जाहिरातींच्या कमाईवर होईल. या वर्षी जाहिरातींच्या महसुलात 10 अब्ज डॉलर्सची घट होऊ शकते. फेसबुकच्या कमाईत या कमाईचा मोठा वाटा आहे.

बातम्या आणखी आहेत...