आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:शहीद पोलिस, जवानांच्या पाल्यांना प्रवेशात प्राधान्य; यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नियम लागू : उदय सामंत

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलिसांचे पाल्य तसेच दहशतवादी हल्ल्यातच शहीद झालेल्या लष्करी जवान, निमलष्करी जवान यांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात एका जागेवर प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये व त्यानंतर होणाऱ्या प्रवेशाकरिता हे नियम लागू राहणार आहेत, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दि. २७ फेब्रुवारी २००८ च्या शासन निर्णयानुसार मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या व राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोफत शिक्षणाची सुविधा प्रदान करण्याबाबत आदेश जारी करण्यात आलेले आहेत. त्यानुसार तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी संस्थास्तरीय कोट्यातील व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या रिक्त राहिलेल्या जागांवरील संस्थास्तरावर होणाऱ्या प्रवेशामध्ये शहिदांच्या पाल्यांना पाल्यांना प्रति अभ्यासक्रम जास्तीत जास्त एका जागेवर प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल, असे सामंत म्हणाले.