आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालघरच्या डहाणू तहसीलमध्ये गुरुवारी सकाळी ‘विशाल फायर वर्क्स’ नावाच्या फटाका कंपनीला भीषण आग लागली. डहाणू महामार्गापासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर जंगलात हा कारखाना आहे. परंतु, कारखान्यात झालेल्या स्फोटाचा आवाज 5 किमी अंतरावर ऐकू आला, त्यामुळे हा स्फोट मोठा असू शकतो, असे मानले जात आहे. कारखान्यातून निघणारा धूर अनेक किलोमीटर दूरूनही दिसू शकतो.
या प्रकरणात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने असे म्हटले आहे की, अपघातात आतापर्यंत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कारखाना जंगलाच्या मध्यभागी असल्याने अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. आग विझवण्याचे काम सुरूच आहे.
कारखान्यात मधूनमधून होत आहेत स्फोट
कारखान्याच्या आत किती लोक आहेत आणि ही घटना कशी घडली, याबाबत पोलिसांनाही अद्यापत माहिती नाही. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले की किती लोक आतमध्ये अडकले आहेत याची पोलिस चौकशी करत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत, तर अधून मधून झालेल्या स्फोटांमुळे ही आग रोखणे फार कठीण जात आहे. कारखान्याजवळ जाणे शक्य नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.