आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत 15 वर्षांनंतर धुवाधार:मुसळधार पावसाने लाेकल सेवा ठप्प, तीन मुलींसह पाच जण गेले नाल्यात वाहून

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2005 नंतरची सर्वाधिक अतिवृष्टी, 24 तासांत 20 सेंटिमीटर पाऊस
  • कोकणात पाऊस, रायगडमध्ये 25 जणांची पुरातून सुखरूप सुटका

मुंबई आणि उपनगरांना मंगळवारी पावसाने झाेडपून काढले. साेमवारी रात्रभर मुसळधार सुरू झालेला पाऊस मंगळवारी जाेरदार काेसळला. त्यामुळे सखल भागात सर्वत्र पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडून गेली होती. आधीच टाळेबंदी, त्यात पावसाचा मार यामुळे मुंबईकरांची मोठी दैना उडाली. पुढचे ४८ तास हवामान विभागाने मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

परळ, कुर्ला, वडाळा व सायन येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे सकाळी १० च्या सुमारास मध्य, पश्चिम व हार्बर हे तिन्ही लोकल मार्ग ठप्प झाले. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल सुरू आहे. त्यामुळे लोकल सेवा ठप्प होण्याचा फटका बसला नाही. मुसळधार पावसामुळे मंत्रालय तसेच उपनगरातील इतर शासकीय कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. धुवाधार झालेल्या पावसामुळे मुंबईतल्या ५६ मार्गांवरील बेस्ट बसेसचे मार्ग वळवण्यात आले. मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर व पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शहरात फिरून आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेतला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील हिंदमाता परिसरात जाऊन पाहणी केली. २००५ नंतर आज मुंबईत सर्वाधिक अतिवृष्टी झाली. महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर असून त्यांचे काम सुरू असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

घरांची पडझड, तीन महिला नाल्यात वाहून गेल्या

पावसाच्या संततधारेमुळे सांताक्रूझमध्ये एका घराची पडझड हाेऊन एका महिलेसह तीन तरुणी नाल्यात वाहून गेल्या. यातील महिला आणि एका मुलीला वाचवण्यात यश आले. गाेराईच्या समुद्रकिनाऱ्यापासून १२ किमी अंतरावर समुद्रात एक बाेट बुडाली असून त्यातील दाेन मच्छीमार बेपत्ता झाले आहेत. अन्य ११ जणांना वाचवण्यात आले आहे.

महाराष्ट्र, गुजरातसह पाच राज्यांत ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने गुजरात, मध्य महाराष्ट्र, काेकण- गाेवा राज्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने उद्या, बुधवारी पश्चिम किनारपट्टीवर रेड अलर्टचा इशारा दिला असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना गुरुवारपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...