आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अाज जागतिक बाल दिन आहे. यानिमित्त माजी क्रिकेटपटू आणि युनिसेफचा सद्भावना राजदूत सचिन तेंडुलकरने कोरोनाबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या जगातील दोन बाल योद्ध्यांशी संवाद साधला. भारतातील रिया आणि अफगाणिस्तानच्या हिनाशी संवाद साधताना सचिन म्हणाला की, तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमच्या आतील मूल नेहमी तुमच्यासोबत असायला हवे. तुम्ही नेहमी जिज्ञासू असावे, नवीन गोष्टी शिकाव्यात आणि नव्या गोष्टींचा अवलंब करावा. मी माझ्या मित्रांना नेहमी सांगत असतो की, तुम्ही कितीही मोठे झालात तरी कुठल्याही गोष्टीबाबत तुमच्यात उत्साह असावा, तुमच्या आतील मूल नेहमी कायम राहावे. जगभरातील मुलांसाठी हा माझा संदेश आहे.
डॉक्टर व्हायचे आहे, असे रियाने सांगताच सचिन म्हणाला, ‘मी लहान होतो तेव्हा शिक्षक नेहमी सांगत असत की, रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरला बोलावण्याची गरज भासत नाही. मी सफरचंद खात होतो. सुदैवाने डॉक्टर माझ्यापासून दूरच राहिले. आता माझे लग्नच डॉक्टरशी झाले आहे. त्यामुळे मी शिक्षकांना सांगेन की, रोज एक सफरचंद खाण्यापेक्षा डॉक्टर आपल्याजवळ असणे हा उत्तम पर्याय आहे. डॉक्टर सोबत असेल तर तुम्ही तणावमुक्त असता, हा माझा अनुभव आहे. सचिन म्हणाला, हात धुणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही सर्व मुला-मुलींनी राजदूत व्हावे आणि हात धुतल्यामुळे आरोग्याला हानी पोहोचवणारे सर्व विषाणू नष्ट होतात, त्याद्वारे तुम्ही अनेक आजार दूर ठेवू शकता, हा संदेश सर्वांना द्यावा. मी नेहमी हात धूत असतो.’ आपण मुलांसाठी चांगले जग कसे बनवू शकतो, या हिनाच्या प्रश्नावर सचिन म्हणाला, ‘मुलांमध्येच भविष्य दडलेले आहे. आपण सर्वांनी मिळून काम केल्यास उत्कृष्ट जग निर्माण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सकारात्मक राहून योग्य दिशेने विचार केला तर तुमचे लक्ष समस्येवर नव्हे तर ती सोडवण्याकडे असेल.’ सचिन म्हणाला, फक्त हात धुणेच पुरेसे नाही, आपण आजूबाजूलाही स्वच्छता राखायला हवी. आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो. त्यामुळे आईची काळजी घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपण आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीला स्वच्छ बनवू हाच माझा संदेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.