आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:मटका किंग रतन खत्री यांचे निधन, वयाच्या 88 व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1960 च्या दशकात त्यांनी या धद्यांची सुरुवात केली होती

मटका किंग रतन खत्री यांचे निधन झाले आहे. मुंबईतील नवजीन सोसायटीतील राहत्या घरा त्यांनी 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 1960 च्या काळात त्यांनी कल्याण भगत यांच्यासोबत मुंबईत मटक्याचा धंदा सुरू केला होता. मागील अनेक दशकांपासून आणि आजही मटका अनेकांचा आवडीचा धंदा आहे. खत्री यांच्या जाण्याने सट्टा किंवा मटका क्षेत्रात दुख व्यक्त होत आहे.

1960 च्या दशकात खत्री यांनी कल्याण भगत यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. खत्री भगतला मॅनेजर म्हणून जॉइन झाले होते. 1964 मध्ये खत्री यांनी भगतपासून वेगळे होऊन स्वत: चा रतन मटका सुरू केला. मटका किंवा एका भांड्यात चिट्सवरून चिठ्ठी काढणे इतके प्रसिद्ध झाले की त्या काळात जुगाराची उलाढाल दररोज 1 कोटी रुपयांच्या घरात असायची. 

सट्टा, मटका किंवा लॉटरी हा आकड्यांचा खेळ म्हणून लोकप्रिय आहे. हा खेळ स्वातंत्र्यांच्या पूर्वीपासूनच मुंबईत प्रसिद्ध आहे. यात न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजमधून कापसाचे दरवाजे उघडणे व बंद करणे यावर पैसे लावले जायचे. 1960 च्या दशकात मटका हा मुंबईतील सर्वच वर्गात लोकप्रिय होता. 

बातम्या आणखी आहेत...