आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचा भाजपला टोला:म्हणाले - क्रॉस व्होटिंगची अफवा पसरवणाऱ्यांनी स्वतःची मते सांभाळावी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रॉस व्होटिंगची अफवा पसरवणाऱ्यांनी स्वतःची मते सांभाळावी, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपला लगावला. ते मुंबईत बोलत होते.​​​राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे आमदार मुंबईत एकत्र आलेत. यामुळे भाजपने मविआवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्याला राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

सर्व जण आमच्यासोबत

राऊत म्हणाले, लहान पक्ष आमच्यासोबत आहेत. आम्हाला पूर्ण बहुमत असून आमदारही आमच्यासोबत आहेत. आमच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नाही यावरुन हेच लक्षात येते. घाबरल्याने आम्ही आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले नाही. क्रॉस व्होटिंगची शक्यता वाटत नाही, आम्ही चारही जागा जिंकणारच, असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री उमेदवार ठरवतील

विधानसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले आहेत, अशी चर्चा सुरू होती. आमिशा पाडवी यांना उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर बोलताना विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. अजून उमेदवार निश्चित झाले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर फडणवीसांची प्रकृती ठणठणीत असती, तरीही राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीची निवडणूक आम्हीच जिंकली असती. असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपचे आमदारही मुंबईत

भाजपच्या आमदारांना बॅगा भरून मुंबईत येण्याचे आवाहन भाजपने केले आहे. यावेळी त्यांना ताज हॉटेलमध्ये ठेवणार येणार आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. उद्या भाजप आमदारांची बैठक होणार असून निवडणुकीबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

काँग्रेसची बाजू दुबळी नाही

काँग्रेसच्या नाराजीचा प्रश्न येत नाही काँग्रेसकडे 44 मते आहेत. त्यांचा उमेदवार जरी बाहेरचा असला तरी काँग्रेस एकसंघ आहे. त्यामुळे काँग्रेसला फटका बसणार नाही. काँग्रेसचा उमेदवारही निवडून येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...