आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक बलात्कार प्रकरण:पोलिसांनीच पीडितेला रुग्णालयात दाखल केले, मुंबई सुरक्षित आहे; साकीनाका प्रकरणावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीडितेच्या आईने सांगितली हकिकत

मुंबईतील साकीनाका परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, या घटनेत महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज डॉक्टरांनी सदरील पीडित महिलेला मृत घोषित केले आहे. या प्रकरणावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विशेष म्हणजे पीडित महिलेचा मृत्यू होण्यापूर्वी महापौरांनी संबंधित रुग्णालयाला भेट देत तिची विचारपूस केली होती. दरम्यान, महापौरांनी डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेत रुग्णालयाच्या डीन विद्या ठाकूर यांच्याशी ही संवाद साधला. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी पीडित महिलेच्या आईशी संवाद साधत घटनेची माहिती घेतली.

पीडितेच्या आईने सांगितली हकिकत
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिला त्या पुरुषांसोबत मागील 10 ते 12 वर्षापासून राहत होती. दरम्यान, त्या दोघांमध्ये भांडण व्हायचे. तो तिला सतत मारहाण करायचा हे कळल्यावर स्थानिकांनी पोलिसांनी बोलावून घेतले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत महिलेला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी तत्परता दाखवून तिला रुग्णालयात दाखल केले आणि मुंबई सुरक्षित आहे. असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

संपूर्ण प्रकरण काय?
साकीनाका येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने शहरातील एका रुग्णालयात उपचारांदरम्यान प्राण सोडले आहे. पीडिता महिला 9 सप्टेंबरला साकीनाका परीसरातील खैरानी रोडवर बलात्कारानंतर बेशुद्धा अवस्थेत सापडली होती. या घटनेत पीडित महिलेसोबत निर्भयासारखे व्यवहार झाल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही घटना शुक्रवारी रात्री तीन वाजता घडली होती. आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या खासगी अवयवात रॉड घुसवला होता. यामुळे पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी पीडित महिलेला खैरानी रस्त्यावरून उचलून आणले होते. पोलिसांनी आतापर्यंत सदरील प्रकरणात आरोपींना अटक केली आहे.

महिलेच्या खासगी अवयवात जखम
डॉक्टरांच्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या अंतर्गत भागात जखम झाली आहे. महिलेचे आॅपरेशन करण्यात आले असून तीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख मोहन चव्हाण अशी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...