आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:एमबीबीएसच्या परीक्षा जूनमध्ये हाेणार; लवकरच वेळापत्रक, ४५० प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना कोरोना संसर्ग

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आता जून महिन्यात होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी सांगितले. या परीक्षा एप्रिल महिन्यात होणार होत्या. आता त्या जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत. परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ये-जा करण्यास बऱ्याच अडचणी येत होत्या. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनादेखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व पाहता परीक्षा पुढे ढकलणे शक्य असल्याने आम्ही हा निर्णय घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, असे देशमुख यांनी सांगितले होते. विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे ४५० प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि त्यांच्या संपर्कातील ३५० जण कोरोनाने ग्रासले आहेत. त्यामुळे चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...