आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गौरवोद्गार:राज्याच्या कोरोनावरच्या उपाययोजना इतर राज्यांसमोर आदर्श ठरल्या : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राकडून येणारे 19 हजार कोटी बाकी

कोरोनाचा मुकाबला करताना महाराष्ट्र सरकारने केलेल्या विविध उपाय योजना, आणि व्यवस्थापन अन्य राज्यासमोर आदर्श ठरले आहेत. शेतकऱ्यांना मदत, धान्य खरेदी, शिव भोजन योजना, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणे यासह अनेक योजना राबवण्यात माझे सरकार यशस्वी प्रयत्न करीत आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काढले.

महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सदस्यांच्या एकत्र झालेल्या सभेत राज्यपालांनी अभिभाषण केले. या भाषणातून त्यांनी गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. विशेषता कोरोना काळात सरकारने केलेल्या कामाचा आणि इतर योजनांचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. ते म्हणाले की कोविडचा मुकाबला करताना राज्यातील कोविड योद्ध्याने जे काम केले आहे, ते वंदनीय आहे, व्यवस्थापन आणि उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र आदर्श ठरला आहे. ‘मी आणि माझे कुटुंब’ आणि ही संकल्पना यशस्वी राबविल्यानंतर आता ‘मी जबाबदार’ ही संकल्पना राबविली जात आहे. विशेषता धारावी मध्ये कोरोना रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या तेथील व्यवस्थापन झाले ती कामगिरी प्रभावी ठरली.

गेल्या वर्षभरात राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रात पायाभूत सुविधांची अनेक कामे केली आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढल्या आहेत, आणखी वैद्यकीय महाविद्यालये, दवाखाने सुरू करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. शेतकऱ्यांबरोबरच बांधकाम कामगारांनाही राज्य सरकारने आर्थिक मदत दिली आहे.

केंद्राकडून येणारे 19 हजार कोटी बाकी
राज्याच्या महसूल उत्पन्नात यावेळी ३५ टक्के कमी महसूल मिळाला आहे. केंद्र सरकारकडे जवळपास विविध उपक्रमातून मिळणारे १९ हजार कोटी रुपये येणे आहेत. याचाही उल्लेख राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात केला. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेमध्ये सुनील प्रभू यांनी आभार प्रदर्शनाचा ठराव मांडला आहे. त्यावर मंगळवार आणि बुधवारी चर्चा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...