आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवशेन:शाळांत अत्याचारी घटना रोखण्यासाठी उपाययोजना - देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा-महाविद्यालयातील मुलांत अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रिकरण यांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टीकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार, हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.

माटुंग्यातील मनपा शाळेतील १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत आ. उमा खापरेंनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, सायबर गुन्ह्यांबाबत तक्रारींच्या तांत्रिक तपासणीसाठी राज्यात प्रत्येक ठाण्यात सायबर प्रयोगशाळा स्थापन्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...