आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानर्मदा आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांच्या नर्मदा नवनिर्माण अभियानाने (एनएनए) मिळालेला निधी लपवून ठेवल्याची तक्रार ईडी, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि प्राप्तिकर विभागाकडे करण्यात आली आहे. या तक्रारींवरून केंद्रीय संस्थांनी या व्यवहाराची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे मेधा पाटकर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
मेधा पाटकरांशी संबंधित या सेवाभावी संस्थेच्या बँक खात्यात 20 वेगवेगळ्या व्यक्तींनी एकसमान निधी जमा केला. तसेच, या ट्रस्टला सुमारे सव्वा कोटी रुपये दान स्वरूपात दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. यावरून ईडी व डीआरआयने वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या व्यवहाराची चौकशी सुरू झाली असून 18 जून 2005 रोजी हा व्यवहार झाल्याची माहिती आहे.
पाटकरांची केंद्राविरोधात आक्रमक भुमिका
मेधा पाटकर यांनी सरदार सरोवर प्रकल्प, काही आण्विक प्रकल्प तसेच काही कोळसा खाणींना विरोध करून मोठी आंदोलने केली होती. अशात केंद्राच्या सीएए तसेच कृषी कायद्याविरुद्धही त्यांनी आक्रमक भूमिका मांडली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.