आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईच्या शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात हे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात संजय राऊत हे सुनावणीदरम्यान सतत गैरहजर होते. त्यामुळे त्याच्याविरोधात वॉरंट जारी करण्याची मागणी करण्यात आली होती. ही माहिती देताना किरीट सोमय्या म्हणाले की, आज (शुक्रवार) न्यायालयाने मेधा सोमय्या यांचे सुमारे तासभर जबाब नोंदवले. त्यानंतर न्यायालयाने राऊतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 24 जानेवारीला होणार आहे.
काय आहे मेधा सोमय्या यांचा आरोप
मेधा सोमय्या यांनी आरोप केला की संजय राऊत यांनी आपल्या विरोधात खोटी विधाने केली आणि 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात आपला सहभाग असल्याचा आरोप केला. यामुळे माझी बदनामी झाली आणि प्रतिमा मलिन झाली. त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात (मुलुंड, मुंबई) राऊत यांच्याविरोधात एफआयआरही दाखल केला आहे.शौचालय घोटाळ्याचा आरोप करून संजय राऊत यांनी आपला छळ आणि बदनामी केल्याचा आरोप मेधा सोमय्या यांनी केला आहे. संजय राऊत हे किरीट सोमय्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर टॉयलेट घोटाळावरुन वेगवेगळे आरोप केले होते.
किरीट सोमय्या यांचा किशोरी पेडणेकरांवर निशाणा:म्हणाले- उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावे महापौरांवर कारवाई का केली नाही?
उद्धव ठाकरे यांनी महापौर राहिलेल्या किशोरी पेडणेकरांविरोधात कारवाई का केली नाही? याचे उत्तर द्यावे. असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईच्या शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात हे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.